भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचेनि कृपामृतें । पोखें माझें जीवन भातें

jayacheni krupamruten | pokhen majhen jivan bhaten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जयाचेनि कृपामृतें । पोखें माझें जीवन भातें ॥१॥ कैसा विसरों मी यासी । एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥ नेणोनियां आपपर । केला माझा अंगिकार ॥३॥ निळा म्हणे शिकवा बोल । बोली बोलणें सुढाळ ॥४॥