भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया नावडे पंढरी । निरयवासी तो अघोरी

jaya navade pandhari | nirayavasi to aghori

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जया नावडे पंढरी । निरयवासी तो अघोरी ॥१॥ विठोबासी निंदी वाचा । यमदंड तो पावे साचा ॥२॥ नेघे विठोबाचें नाम । वृथा गेला त्याचा जन्म ॥३॥ निळा म्हणे प्रेतरुप । त्याचे पुण्य तेंचि तें पाप ॥४॥