भजनी मालिका
← भजनांकडे परत

जावोनी राउळा जोडूनियां हात बोले ज्ञानेश्वर विठोबासी

javoni raula joduniyan hat bole dnyaneshvar vithobasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जावोनी राउळा जोडूनियां हात बोले ज्ञानेश्वर विठोबासी।।१॥ करावीं हीं तीर्थे आवड अंतरीं। घ्यावें बरोबरी नामदेवा। २॥ ऐकतांचि ऐसें म्हणे पांडुरंग न धाडितां राग येईल तुज ॥३॥ तयाविण मज घडी जरी जाय। युगा ऐसी होय ज्ञानेश्वरा ||४|| जनी म्हणे मग नामया पाचारी कृपालुवा हरि मायबाप ॥५॥॥