भजनी मालिका
← भजनांकडे परत

जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणीं बाळचंद्र खेळतां दिसे

jatil dhuladhusir dondil dolasu anganin balachandra khelatan dise

जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणीं बाळचंद्र खेळतां दिसे ॥ तें देखोनियां यशोदा माया पसरोनिया बाह्या ॥ तें क्षेम सांगावया वाचा कैंची ॥१॥ वालभते ब्रह्म गोकुळीं आनंदे ॥ गौळियाच्या छंदें खेळतां दिसे ॥ध्रु०॥ थुरथुर चालत भूमि पाय ठेवित । आंतु बाहिर दावित यशोदे माये ॥ तो नित्य पूर्ण ह्यणे कडे घे कांवो आमये ॥ स्तनपान दे कां सये वोसंगागे माये ॥२॥ दोनी चारी कणिका वक्रारविंदी देखा । तें मुखमय कां माहेर होता ॥ तें उचलेनि कपोळीं स्नेहें चुंबिती गौळणी । मांजयाची सिरयाणी ध्यानीं मुनिजनागे माये ॥३॥ विश्व प्रतिबिंबाचें बिंब तो कान्हया वो साजणीं । त्यासी वोसंगा घेउनी गौळणी स्तनपान देती ॥ सवेंचि कासाविस होती ते पाही । मां साच कीं कान्हया नाहीं तेथें यशोदा ते कैची ॥४॥ वेदाशास्त्रा पुराणा आणि यज्ञतप दाना । श्रुति धांडौळितां मना ठावो नुरेचि । मां मां म्हणोनि गौळणी अंगोळिया धरिती । मां विस्मयो करिती चोज अचोजगे माये ॥५॥ ब्रह्मदिकां लक्षा नये कल्प गेले युगे युगे । तो गौळणीया वोसंगा निघालगे माये ॥ तें बाळ भावाचे कीं संतत दैवाचे । न वर्णवे वाचे दिपोदिपिवो माये ॥६॥ सांवळा सुजेडु कीं सुधेपरिस गोडु । तो या डोळ्या उजियेडु डोळसु तो ॥ त्यानें एकै घेइजे एके पुजिजे । मां प्रीतिचेनि माजे नेणिजे दुजेगे माये ॥७॥ हारवी कांई आपुलेपण न सांडितां गांवोगांवीचा होत जात । तैसा गोकुळीं गोपिनाथु सकळ जना ॥ कृष्ण परब्रह्म पुतळा कीं आनंदाची कळा । तो हा भोगविता हे लीळा मदनाची गे माये ॥८॥ एक पावलों म्हणती ते कांहींच नेणती । अनुसरलिया हातांतळी पावा पावा म्हणे निवृत्तिदासु हरी । बापरखुमादेविवरु विठ्ठलु करिते निकेगे माये ॥९॥