भजनी मालिका
← भजनांकडे परत

जतनेलागीं जीवन ठेविलें

jatanelagin jivan thevilen

जतनेलागीं जीवन ठेविलें । विश्वरुप हारपलें ज्ञानपंथी ॥१॥ माझी दोन्ही सामावली दोन्ही सामावली । निजब्रह्मीं गुंडाळिली मनेंरहित ॥२॥ अवघा कोल्हाळ एकनिष्ठ जाला । ब्रह्मरसीं बुडाला निवडेचिना ॥३॥ रखुमादेविवर जगाचें जीवन । त्याचेंही मीपण गेलें विठ्ठलनामें ॥४॥