भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ

janmoniyan ihalokin kay kelen

रचनाकार: संत संताजी · अभंग
जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ । पुष्कळच ते धन मिळविलेँ ।। आणिक मिळविलेँ वतनवाडिशीँ । रांडा आणि पोरां आवघ्याशीँ ।। संतु म्हणी तुम्हीँ मागेँ ते सरावेँ । मरावेँ परी किर्तीरूपे उरावेँ।।