भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म खातां उष्टावळी सदा राखी चंद्रावळी

janma khatan ushtavali sada rakhi chandravali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जन्म खातां उष्टावळी सदा राखी चंद्रावळी॥१॥ राहीरुक्मिणीचा कांत भक्तिसाठी कण्या खात ॥२॥ देव भुलले पांडुरंग ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥ जनी म्हणे देवराज करी भक्ताचें हो काज ॥४॥