भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म जरा दु:ख बाधा

janma jara du:kha badha

जन्म जरा दु:ख बाधा । स्मरता नाहीं गोविंदा । ऐसा जयासी नित्य धंदा । तोचि सदा सुखरुप ॥१॥ धन्य कुळ धन्य याती । धन्य जन्म पुढती पुढती । भक्तीवीण नाहीं गती । मुखीं हरिनामउच्चार ॥२॥ विश्वीं विश्व जो व्यापकु । तोचि माझा हरि एकु । त्यासी भक्तिविण साधकु । नोळखे पै दुर्बुध्दि ॥३॥ ज्ञानरंजनीं रंजला । ज्ञानबोधें उपजला । ज्ञानदेवीं हरि सेविला । निरंतर सर्वकाळ ॥४॥