भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म गेले याचे राखतां गाई । याचिया बोला वि-श्वास काई

janma gele yache rakhatan gai | yachiya bola vi-shvas kai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्म गेले याचे राखतां गाई । याचिया बोला वि-श्वास काई ॥१॥ गोधनें राखितो आपण पेंढारा । तुझ्यानी मिळती पाणियाचा थारा ॥२॥ हातीं डांगा खांदीं कांबळा । तुझ्या गाई आह्मी राखों गोपाळा ॥३॥ आठ कोटी नव बहात्री गाई । गोधनें बैसलीं आपुले ठायीं ॥४॥ धालीं गोधनें बसलीं वाडां । संत पाहों आले तंव झोंपा उघडा ॥५॥ गोधनें चरती बाराही रानें । माझें मन तुझें वासरूं तान्हें ॥६॥ गोधनें चारितां कृष्ण सांगाती । विष्णुदास नामा देतुसे वळती ॥७॥