भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणावा तो नर देवचि साचार

janava to nar devachi sachar

रचनाकार: संत रामदास · अभंग
जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व । तयालागी सर्व सारखेचि निंदकां वंदकां संकटी सांभाळी । मन सर्वकाळी पालटेना पालटेना मन परस्त्रीकांचनी । निववी वचनी पुढिलांसीं पुढिलांसी नाना सुखें देत आहे । उपकारीं देह लावितसे लावितसे देह राम भजनासी । रामीरामदासीं रामभक्त।