भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणसी तें करीं कृपाळुवा हरि । लाज सर्वांपरी आहे तुज

janasi ten karin krupaluva hari | laj sarvampari ahe tuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाणसी तें करीं कृपाळुवा हरि । लाज सर्वांपरी आहे तुज ॥१॥ आरूष साबडें मी कांहीं नेणें वेडें । जन्मोनि सांदडें केलें तुज ॥२॥ बहुकीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥३॥ नाहीं तुझी सेवा केली मनोभावें । लोभ दंभ गर्व भ्रांति सदा ॥४॥ नामा म्हणे मज होताती विपत्ति । सोडवीं श्रीपति येथोनियां ॥५॥