भजनी मालिका
← भजनांकडे परत

जननी बाळका कोपे रागें । परि ते आहार तिसची मागे

janani balaka kope ragen | pari te ahar tisachi mage

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जननी बाळका कोपे रागें । परि ते आहार तिसची मागे ॥१॥ तैसा तुज मी शरण । पंढरिराया निरुता जाण ॥२॥ खेटी म्हणोनि परतें लोटी । परि ते चरणीं घाली मिठी ॥३॥ टाकोनी जाय कडीये नेघे । परि तें धांवे तियेचि मागें ॥४॥ विठा म्हणे पंढरिनाथा । आम्हां नुपेक्षीं सर्वथा ॥५॥