भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सज्ज्न वर्तताती

jaisa vruksha nene man apaman | taise te sajjna vartatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सज्ज्न वर्तताती ॥१॥ येऊनियां पूजा प्राणि जे करिती । त्याचें सुख चित्तीं तया नाहीं ॥२॥ अथवा कोणी प्राणि येऊनि तोडिती । तयाअ न म्हणती छेदूं नका ॥३॥ निंदा स्तुति सम मानिती जे संत । पूर्णा धैर्यवन्त सिंधु ऐसे ॥४॥ नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी । तरी जीव शिवा मिठी पडुनि जाय ॥५॥