भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे

jagatrajivana aga narayana | kan naye karuna dasachi he

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे ॥१॥ अच्युता केशवा ये गा दीनानाथा । सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥ चिद्‌घना चिद्‌रूपा विरंचीच्या बापा । करावी जी कृपा सर्वांभूतीं ॥३॥ तुझें म्हणविलें उपेक्षिसी जरी । नामा म्हणे हरी ब्रीद काय ॥४॥