भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगत्र धांवताहे सैरा

jagatra dhanvatahe saira

जगत्र धांवताहे सैरा म्हणौनि धांवसी । थोर कष्टलासी वायाविण ॥ धांवोनि जावोनि काय करिसी । सहज अहिर्निशी भेटी नाहीं ॥१॥ जीव जाणवेना जीव जाणवेना । जिवाचें वर्म तें चोजवेना ॥२॥ जिवाशिवा दोन्हि भिन्न भेदु नाहीं । विचारुनि पाहि ह्रदयामाजी ॥ जिउ सर्वाठायीं असे योगिया न दिसे । कुडी सांडूनि वसे कवणे ठायीं ॥३॥ जिउ जैसाचि आला तैसाचि गेला । तो कोठें सामावला जाणतेनो ॥ ज्ञानदेवो म्हणे जिउ कोठें गेला । जिवा जन्म जाला कवणे ठाई ॥४॥