भजनी मालिका
← भजनांकडे परत

जडोनियां ठेली । वृति पायीं लिगटली

jadoniyan theli | vruti payin ligatali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जडोनियां ठेली । वृति पायीं लिगटली ॥१॥ मुखीं नामाचि गर्जना । हरिचा आठव क्षणक्षणा ॥२॥ रुपाचें चिंतन । तेथेंचि गुंतलें मन ॥३॥ निळा म्हणे दिलें । देह पायीं समर्पिले ॥४॥