भजनी मालिका
← भजनांकडे परत

जडांतील शुध्दांश कौतुकें रिघाला

jadantil shudhdansh kautuken righala

जडांतील शुध्दांश कौतुकें रिघाला । निवृत्तीने दाविला कृपा करुनी ॥१॥ अनुहात भेद दाविला कृपनें । सर्व हें चैतन्य गमलें तेव्हां ॥२॥ ज्ञानदेव नमनीं निवृत्तीचे पदीं । आनंद ब्रह्मपदीं एक झाला ॥३॥