भजनी मालिका
← भजनांकडे परत

होय अंतरी पालट । करितां पाठ हरिनामें

hoy antari palat | karitan path harinamen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
होय अंतरी पालट । करितां पाठ हरिनामें ॥१॥ देवा ऐसे देवचि होती । जे या भजती विठठला ॥२॥ ऐसा याचा प्रताप ठसा । प्रगटे सरिसा नामजपें ॥३॥ निळा म्हणे लटिकें नव्हे । पहा स्वानुभवें आपुलिया ॥४॥