भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या

houni haran rahila te vanin | doghi tya harini sriya jhalya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥ जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥ धाकुटीला दोन्ही पाडसें गोजिरीं । दुजी गरोदरी पूर्ण मास ॥३॥ नामा म्हणे पुढें काय झाली गती । कथेची संगति ऐका बरी ॥४॥