भजनी मालिका
← भजनांकडे परत

होसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी

hosi bhaktancha konvasa | tujhin briden hlashikesha | niv-vilen sayasa | krupasindhu murari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
होसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥ अंबरुषिकारणें । दहा वेळ गर्भवासा येणें । अवतार धरिला नारायणें । गजापूर नगरीं ॥२॥ अंदुरायाच्या घरीं । बाळ जळसेनाच्या कुमरीं । मत्स्य रूप अवतार धरी । वेद हरणकैवारी नारायण ॥३॥ विद्यापुर नगरीं । अंधरुराजा राज्य करी । श्रियादेवी त्या सुंदरी । उदरीं कुमरु जन्माला ॥४॥ पृथ्वी रसातळवटीं । जातां थोर अंदोळली सृष्टी । धांवण्या धांवले जगजेठी । धर पृष्ठीं सांवरिली ॥५॥ मर्गजपुरीं पुरपती । हिर-ण्याक्ष चक्रवर्ती । अग्नि असे जनवंती । घरीं बाळ वराह ॥६॥ त्रिदश-देवश्रिया चाडा । हिरण्याक्ष वधिला गाढा । भूगोल धरूनियां दाढा । केला निवाडा स्वर्यीचा ॥७॥ कर्पूरपुरपाटण । हरिभक्तीचें हें स्थान । सदयादेवी प्रिया नंदन । उदरीं नृसिंह जन्मला ॥८॥ पित्या पुत्रा झाली कळी । स्तंभीं प्रगटला तयेवेळीं । असुर मारिला करकमळीं । भक्त प्रर्‍हाद रक्षिला ॥९॥ कश्यपनंदनवर्धन । कोवळादशाचा वामन । खुजट रूप धरून । महेंद्रपुरीसी आला ॥१०॥ दानें तपें व्रतें बळी । सोही घातला पाताळीं । अद्यापि राहिला जवळी । चरणातलीं पद देउनी ॥११॥ रेणापुरीं देवी रेणुका । लाधली जमदग्नीस देखा । तिचे उदरीं विश्वतारका । परशुराम जन्मला ॥१२॥ असुरीं वधि-येली माया । ह्मणे धांवें पुत्रराया । अवचित पातला धावया । सह-सार्जुन मारिला ॥१३॥ अयोध्या नाम नगरी । जन्म कौसल्ये उदरीं । देवभक्तांचा कैवारी । दशरथनंदन राघव ॥१४॥ राम त्रैलोक्यीं वीर दारुण । तेणें वधियेला रावण । अढळपद देऊन । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥१५॥ मथुरा नामें नगरीं । वसुदेव दे-वकी उदरीं । कृष्ण आठबा अवतारी । लीला विग्रहि जन्मले ॥१६॥ कंस चाणूर मर्दिले । विमळार्जुन उन्मळिले । सप्त गर्भाचे सूड घेतले । रक्षिलें गाई गोपाळां ॥१७॥ बौद्ध श्रीवत्साच्या घरीं । जन्म शांभवीच्या उदरीं । राजा कांतिये नगरीं । निरंतर रूपें राहिला ॥१८॥ ध्यान मुद्रा मांडूनियां । वस्त्रें शस्त्रें त्यजूनियां । राहिला पैं निरंजनिया । भक्तिभाव ओळखे तो ॥१९॥ कल्कि जसरा-याचा पुत्र । सावित्री देवीचा कूमर । शंभलापुरीं करील अवतार । दाही रूपें प्रगटला ॥२०॥ ऐसा अमूर्त मूर्ति विटेव र । उभा राहिला निरंतर । विष्णुदास नाम्याचा दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥२१॥