भजनी मालिका
← भजनांकडे परत

होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे

hore tun viththala hore tun viththala hore

होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे तूं गोपाळा । क्षेम देई रे वेल्हाळा ॥१॥ तुज पाहतां भुललीये चित्ता । काय करुं मी आतां येई पंढरीनाथा ॥२॥ पिसुणें परावीं मज काय करावीं । तुजची आठवी श्रीचरण दाखवी ॥३॥ तुजविण वेल्हाळा कें सुखसोहळा । रखुमादेविवरा विठ्ठला शेजे नलगे डोळां ॥४॥