भजनी मालिका
← भजनांकडे परत

ही माझी मिरासी। पांडुरंग पायापासी

hi majhi mirasi| pandurang payapasi

रचनाकार: संत सेना · अभंग
ही माझी मिरासी। पांडुरंग पायापासी ॥१॥ करीन आपुलें जतन । वागवितों अभिमान ॥२॥ जुनाट जुगादीचें । वडिलें साधियेलें साचें ॥३॥ सेना म्हणे कमळापती। पुरातन हे माझी वृत्ती ॥४॥