भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि आम्हांसी गुरुगम्य । हरीचें नाम उपदेशिलें

henchi amhansi gurugamya | harichen nam upadeshilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हेंचि आम्हांसी गुरुगम्य । हरीचें नाम उपदेशिलें ॥१॥ आणिकां साधनीं चाड नाहीं । घालिती अपायीं म्हणोनियां ॥२॥ योगाभ्यास मंत्रजप । पुरश्चरण तप हरिनाम ॥३॥ निळा म्हणे दाविला मार्ग । हाचि हा चांग गुरुनाथें ॥४॥