भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा

hen vyapuni nirala bhogi vainkunth sohala

हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा । नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥१॥ न साहे सगुण अवघाचि निर्गुण । तो कृष्ण आपण गोपाळवेषें ॥२॥ गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी । वेणु नाना परि वातु असे ॥३॥ निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण । सांगीतली खूण गोरक्षानें ॥४॥