भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेचि चिंता दिवस रातीं । राहिली चितीं न ढळे ते

hechi chinta divas ratin | rahili chitin na dhale te

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हेचि चिंता दिवस रातीं । राहिली चितीं न ढळे ते ॥१॥ कराल माझा अंगीकार । किंवा दूर भोवंडाल ॥२॥ बहुत जन्म घेतां कष्टी । झालों हिंपुटी दु:ख शोकें ॥३॥ निळा म्हणे यावरी आतां । राख अनंता चरणापें ॥४॥