भजनी मालिका
← भजनांकडे परत

हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी

hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥ तुजवांचूनि दाही दिशा । वाट पाहातें जगदीशा ॥३॥ हांसें करुं नको जनासी । ह्मणे नामयाची दासी ॥४॥