भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिश्चंद्रराजा होता सत्त्वगुणी । वाहातसे पाणी डोंबा-घरीं

harishchandraraja hota sattvaguni | vahatase pani domba-gharin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिश्चंद्रराजा होता सत्त्वगुणी । वाहातसे पाणी डोंबा-घरीं ॥१॥ सत्य पतिव्रता तारामति राणी । राहिली भोगोनी काया- क्लेश ॥२॥ भरत ऐकतां मातेचें वचन । श्रीराम दर्शन कैसें घडे ॥३॥ माता पिता सर्व अव्हेरी जनक । नामा ह्मणे भाक प्रारब्ध हे ॥४॥