भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिकथा श्रवण श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें

harikatha shravan shravanacheni dvaren | majhiya dataren keshaven dilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिकथा श्रवण श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥१॥ तीर्थाचें सुख चरणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥२॥ पूजनाचें सुख कराचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥३॥ नामा म्हणे ऐसे जयाचे उपकार । तो विठठल दातार विसरले ॥४॥