भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिकथा ऐकतां संसार आठविती । तयाच्या सुकृति अवघा नाशा

harikatha aikatan sansar athaviti | tayachya sukruti avagha nasha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिकथा ऐकतां संसार आठविती । तयाच्या सुकृति अवघा नाशा ॥१॥ निश्चित होऊनि ऐकतां श्रवणीं । यमाची करणी न लगे कांहीं ॥२॥ आतां रामकृष्ण म्हणे कांरे वाचा । कळिकाळ मोचा बाहतील ॥३॥ विठा म्हणे संतीं अवधान द्यावें । ह्रदयीं धरावें केशवनाम ॥४॥