भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिकथा ऐकतां अनन्य पैं गोष्टी । निधान त्यां दृष्टी अंतरलें

harikatha aikatan ananya pain goshti | nidhan tyan drushti antaralen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिकथा ऐकतां अनन्य पैं गोष्टी । निधान त्यां दृष्टी अंतरलें ॥१॥ घडी घडी प्रेम अंतरूम न द्यावें । सावधान व्हावें रामनामीं ॥२॥ यापरी स्वहितीं ठेवियलें लक्ष । ते पावती मोक्ष म्हणे नामा ॥३॥