भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी

hariharavidhata ale alankapurin | indrayani tirin ek thati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥ योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥ शून्याचिया पोटीं निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥ उन्मनीं निद्रा लागलीसे फार । स्वरुपीं ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥ नामा म्हणे देवा भली देली बुद्धी । लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥