भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी

harihar brahma indradik dev | ichchhitati sarva payadhuli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी ॥१॥ यांवरी गोपाळ आनंदें नाचती । भूषणें श्रीपती शोभायमान ॥२॥ पाहोनियां सुख आले सर्व देव । पंढरीचा राव पाहावया ॥३॥ नामा म्हणे मिषें गोपाळकाल्याचे । निरंतर वाचे घेत नाम ॥४॥