भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि उच्चारणीं अनंत पापराशी

hari uchcharanin anant paparashi

हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसे नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥