भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी त्वां कोणाचें बरवें केलेंज । पूर्ण आम्हां कळों आलें

hari tvan konachen baraven kelenj | purna amhan kalon alen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरी त्वां कोणाचें बरवें केलेंज । पूर्ण आम्हां कळों आलें ॥१॥ नारदा वैष्णव जगजेठी । त्यासी लाविली लंगोटी ॥२॥ मयुरध्वज राजा भला । त्यासि करवतीं घातला ॥३॥ बळी दानशीळ भला । तुवां पाताळीं घातला ॥४॥ भीष्म वैष्णवांचा राव । त्याचा बाणें पूजिला ठाव ॥५॥ रूक्मांगद हरिचा दास । त्याचा गांवच केला वोस ॥६॥ बाळ एकुलतें एक । तें त्वां ज्ञानीच केला शुक ॥७॥ उपमन्यु बाळक पाहें । क्षीरसागरीं कोंडिलें आहे ॥८॥ धुरू बाळक गोजिरवाणें । त्याचें खुंटलें येणें जाणें ॥९॥ हरिश्चंद्र ताराराणी । डोंबा घरीं वाहे पाणी ॥१०॥ प्रल्हाद भक्तीचा भुकेला । त्याचा बाप त्वां वधिला ॥११॥ हनुमंत भक्त निकट । त्यासी केलें तूं मर्कट ॥१२॥ पुण्यवंत राजा नळ । त्याचा केला तुवां छळ ॥१३॥ श्रियाळ राजा भला । त्याचा बाळ त्वां खादलाअ ॥१४॥ तुज कोणी न म्हणे भलें । बाळ पोटीचें कोवळें ॥१५॥ जिकडे तिकडे तुम्ही दोघें । तिकडे तिसरा नामा मागें ॥१६॥ तुज नाहीं जाती कुळ । जेऊनि भ्रष्टविलें बाळ ॥१७॥ जेणें तुझें नाम घेतलें । तें संसारावेगळें केलें ॥१८॥ आतां जेविसी तरी तुज आण । ऐकोनि हांसे जगज्जीवन ॥१९॥ नामा दिला माते हातीं । नयन भरले अश्रुपातीं ॥२०॥ माय पाहे नामदेव । तंव्व तो जालाअ केशवराव ॥२१॥ माय म्हणे नये कामा । तुझा ओपिला तुज नामा ॥२२॥ गोणाई म्हणे हरी । तुझी करणी तुजचि बरी ॥२३॥