भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥ध्रु

hari tujhi aisi kaisi he khod ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥ध्रु०॥ घेउनी चिमुटे मुळसी पळसी । गोपी तुज म्हणती हा दोड ॥१॥ सोडूनी वांसरें गाईसी पाजिसी । यांत तुज काय मिळती जोड ॥२॥ आडवा होउनी गोपीसी धरिसी । चुंबितां वदन मज म्हणसी सोड ॥३॥ अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी । हरी तुझी ऐसी कैशी हे खोड ॥४॥