भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि आत्मा होय परात्पर आलें

hari atma hoy paratpar alen

हरि आत्मा होय परात्पर आलें । नाम हें क्षरलें वेदमतें ॥ १ ॥ वेदांतसिद्धांत नाहीं आनुहेत । सर्वभूतीं हेत हरि आहे ॥ २ ॥ हरिवि न दिसे गुरु सांगतसे । हरि हा प्रकाशे सर्व रुपीं ॥ ३ ॥ निवृत्तिनें कोंदले सद्‌गुरूंनीं दिधलें । हरिधन भलें आम्हां माजी ॥ ४ ॥