भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि असे देही हाचि भावो खरा

hari ase dehi hachi bhavo khara

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरि असे देही हाचि भावो खरा । वाया तू सैरा धावू नको ॥१॥ धावता अवचटे पडसील व्यसनी । संसारपसणी योनिमाळे ॥२॥ हरिचेनि ध्यान निरंतर करी । बाह्य अभ्यंतरी एकु राम ॥३॥ सोपान म्हणे राम नादे सर्वा घटी । विधी जगजेठी क्षरलासे ॥४।।