भजनी मालिका
← भजनांकडे परत

हांसें आलें द्रौपदीसी बापा वचन परियेसी

hansen alen draupadisi bapa vachan pariyesi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
हांसें आलें द्रौपदीसी बापा वचन परियेसी ||१|| सर्व अरिष्ट भंजना तुजलागीं वाहो कोणा ||२|| एक भाव तुझे पाय यावेगळें कांहीं नाहीं ॥३॥ थाळीमाजीं पाहतां अन्न होय क्षुधेर्चे हरण ||४|| थाळी दाखवी देवासी कैंचा विश्वास तुजसी ||५॥ जितां करें बहुते किंचित शाखा निर्मा ||६॥ कैवल्याचा दानी। म्हणे नामयाची जनी ॥७॥