भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाचि माझा शकुन । ह्रदयीं देवाचे चिंतन

hachi majha shakun | hradayin devache chintan

रचनाकार: संत सेना · अभंग
हाचि माझा शकुन । ह्रदयीं देवाचे चिंतन ॥१॥॥ होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता॥२॥ पडियेली गांठी । याचा धाक वाहे पोटी ॥३॥ सेना म्हणे हीनपणे । देवा काय माझें जिणें ॥४॥