भजनी मालिका
← भजनांकडे परत

ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न

grasuni bhan man drushya drashta bhinna

ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न । आपण चिद्धन वैकुंठी रया ॥१॥ तें रूप सखोल कृष्ण रूपें खेळें । नंदयशोदेमेळें गोपीसंगें ॥२॥ नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार । आपण श्रीधर सर्व सुखें ॥३॥ तेंची हें रूपडें कृष्णनामें पिकलें । यमुने स्थिरावलें वेणू वातां ॥४॥ ज्योतिरूपें कीर्ण अनंत विस्तार । ब्रह्मांड आकार अनंतकोटी ॥५॥ निवृत्ति सोज्वळ नित्य नुतन सोय । आपणची होय गोपरूपें ॥६॥