भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरे सांवळे घनवटे । एक चालती एकापुढें

gore sanvale ghanavate | ek chalati ekapudhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोरे सांवळे घनवटे । एक चालती एकापुढें ॥१॥ राम निळीय पुढारी । कनकदंड चौरेवरी ॥२॥ राम लक्ष्मण विजयी झाले । आनंदें अयोध्ये आले ॥३॥ चंद्रगिरीचे तळवटीं । राम सीतेसी झाली भेटी ॥४॥ चंद्रगिरीं चला जाऊं । राम दाशरथी पाहूं ॥५॥ चंद्रगिरीं केला वास । म्हणे नामा । विष्णुदास ॥६॥