भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपिकेचा मेळा आला गृहाप्रती । काय त्या ह्मणती नंदालागीं

gopikecha mela ala gruhaprati | kay tya hmanati nandalagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोपिकेचा मेळा आला गृहाप्रती । काय त्या ह्मणती नंदालागीं ॥१॥ परब्रह्म साक्षात्‍ क्षीरसागरवासी । त्या कैसा धा-डसी वनामध्यें ॥२॥ ब्रह्मा आणि इंद्र आले गोकुळासी । वर्णिती कृष्णासी तुह्मीं देखा ॥३॥ तेहेतीस कोटी देव जयांतें प्रार्थित । त्यासी अरण्यांत रुपती कांटे ॥४॥ दैत्यांचा हा भार जाहला पृथ्वीसी । कंस वधायासी आला येथें ॥५॥ ज्याजसाठीं फार श्रम-ताती योगी । कैलासाचा योगी ध्यान करी ॥६॥ भ्रांती कांरे तुज पडे वेळोवेळां । पाहातोसी डोळां चरित्रास ॥७॥ नामया सुकृत झालें असे फार । म्हणोनी विचार नाठवेची ॥८॥