भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपीगोप तेथें पातलीं त्वरित । हांसतीं समस्त देखो-नियां

gopigop tethen patalin tvarit | hansatin samasta dekho-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोपीगोप तेथें पातलीं त्वरित । हांसतीं समस्त देखो-नियां ॥१॥ कृष्ण ह्मणे कैसी बांधिसी मजला । बांधिलें तुजला भगवंतें ॥२॥ पायां पडती रडोनी बोलती । सोडवा म्हणती आह्मां-लागीं ॥३॥ पाहोनी किवें त्यांची दया आली चित्ता । कृपेनें पाहातां मुक्त झालां ॥४॥ नामा म्हणे तेव्हां वंदोनी देवासीं । गेलीं निज-धामासीं आनंदानें ॥५॥