भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळ संवगडे आले वाडेकोडें

gopal sanvagade ale vadekoden

गोपाळ संवगडे आले वाडेकोडें । असंख्य बागडे हरिरूपीं ॥ १ ॥ बिंबली पंढरी हरीरूपीं सार । अवघाचि श्रृंगार विठ्ठलराजु ॥ २ ॥ कालया कौशल्या नामदेव जाणे । तेथीलीहे खुणे निवृत्तिराजु ॥ ३ ॥ ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा । नहरहि वेगा झेलिताती ॥ ४ ॥ वैकुंठ सांवळे मजि भक्त मेळे । काला एक्या काळें करिताती ॥ ५ ॥ निवृत्ति संपूर्णता घेउनि उद्गारु । सेविता उदार हरिराणा ॥ ६ ॥