भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळ अच्युत हा नाममहिमा

gopal achyut ha namamahima

रचनाकार: संत सोपान · अभंग
गोपाळ अच्युत हा नाममहिमा । नित्यता पूर्णिमा आम्हा देही ॥१॥ रामकृष्ण नाम हा जप परम । ऐसा नित्य नेम सारू रया ॥२॥ वासना वोढाळ नेषो पै बरळ । नित्यता अढळ गोपाळ सेवू ॥३।। सोपान सार जपतुसे नाम । दिननिशी नेम हृदयात ॥४॥