भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोंवळेपणाची बुंथी घेउनिया भेष

gonvalepanachi bunthi gheuniya bhesh

गोंवळेपणाची बुंथी घेउनिया भेष । रिझविशी मानस यशोदेचें ॥१॥ त्या सुखें ब्रह्मांड थोडेंपा तियेशी । दुग्ध पैं मागशी बाळपणें ॥ध्रु०॥ ऐसे मोहिलें पैं जगभक्तअंतरंग । भावाचे सुरंग प्रेमबोधें ॥२॥ मज मानसीं सुख तुझ्या रुपीं वोलावा । सर्व इंद्रियीं दोहावा तुझ्या नामीं ॥३॥ जन हे विव्हळ तुजविण अविचार । गुंफ़ले साचार माया मोहें ॥४॥ आतां ऐसें करी तुज मज सरोवरी । प्रपंच केसरी होई रया ॥५॥ बाप रखुमादेविवरु सोपारा पैं निळा । निवृत्तींनी कळा सांगीतली ॥६॥