भजनी मालिका
← भजनांकडे परत

घुळघुळा वाजती टाळ

ghulaghula vajati tal

घुळघुळा वाजती टाळ । झणझाणां नाद रसाळ । उदो जाला पाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळरे ॥१॥ कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळापोटीं माय रिघेल । मेलें माणूस जीत उठविल । वेळ काळांतें ग्रासीरे ॥२॥ आतां ऐसेंची अवघे जन । तें येतें जातें तयापासून । जगीं जग झालें जनार्दन। उदो प्रगटला बिंबले भानरे ॥३॥ टाळाटाळीं लोपला नाद । अंगोअंगींची मुराला छंद । भोग भोगितांचि आटला भोग । ज्ञान गिळूनि गावा तो गोविंदरे ॥४॥ गांवा आंत बाहेरी हिंडे आळी । देवो देविची केली चिपळी । चरण नसतां वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांति सांवळी ॥५॥