भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनियां पत्र केली प्रदक्षिणा । साष्टांगी ब्राह्मणां नमन केलें

gheuniyan patra keli pradakshina | sashtangi brahmanan naman kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घेऊनियां पत्र केली प्रदक्षिणा । साष्टांगी ब्राह्मणां नमन केलें ॥१॥ मागोनियां म्हैसा नेवाशासी आले । प्राकृत पैं केली गीतादेवी ॥२॥ निवृत्ती म्हणती ऐकें ज्ञानदेवा । अनुभव करावा अमृता ऐसा ॥३॥ आदिशक्तिमाता वंदुनियां म्हाळसा । मग तेथुनी सरिसा चालियेले ॥४॥ क्रमिताती मार्ग अनुभव कुशळ । हरिनाम सकळ कवित्वकळा ॥५॥ येउनी उतरली आळाचिये वनीं । पशु तये स्थानीं शांत जाला ॥६॥ करुनी तया पूजन सेंदूर तेलें लेपून । आळंकावती निजस्थान प्रवेशली ॥७॥ साने थोर सकळ तेथील निवासी । निवृत्ति तयांसी नमस्कारिलें ॥८॥