भजनी मालिका
← भजनांकडे परत

घाण्याचा कर करा पुसलासी मज

ghanyacha kar kara pusalasi maj

रचनाकार: संत संताजी · अभंग
घाण्याचा कर करा पुसलासी मज । तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।१।। दशनाद होती सर्वाँचे ब्रम्हांडी । तुझे काय पिँडी वाजताती ।।२।। संतु म्हणे घाण्याचा करकरा । दशनादाचा तो खरा जगा माजी ।।३।।