भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा

gela prapanch hatincha | lesh nahi paramarthacha

रचनाकार: संत रामदास · अभंग
गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ।। दोहींकडें अंतरला । थोरपणें भांबावला ।। गेली अवचितें निस्पृहता। नाहीं स्वार्थहि पुरता ।। क्रोधे गेला। संतसंग । लोभें जाहला वोरंग ।। पूर्ण जाली नाहीं आस । इकडे बुडाला अभ्यास ।। दास म्हणे क्रोधे केलें । अवघे लाजिरवाणें जालें ।।